सदा देवकाजीं झिजे देह ज्याचा ।
सदा रामनामें वदे नित्य साचा ॥
स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा ।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४८॥
ज्याचा देह नेहमी देवाच्या कामात झिजतो, जो नित्य खरे रामनाम वदतो, आणि स्वधर्माने उत्तमासारखा चालतो, तो दास जगात धन्य आहे.
- समर्थ रामदास