मनाचे श्लोक

सदा बोलण्यासारिखे चालताहे

मनाचे श्लोक ४९.

सदा बोलण्यासारिखे चालताहे ।
अनेकीं सदा एक देवासि पाहे ॥
सगूणी भजे लेश नाही भ्रमाचा ।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४९॥

जो बोलण्यासारखा चालतो, अनेकांत एक देव पाहतो, आणि सगुण भजताना भ्रमाचा लेश नाही, तो दास जगात धन्य आहे.

- समर्थ रामदास