मनाचे श्लोक

मना पापसंकल्प सोडूनि द्यावा

मनाचे श्लोक ५.

मना पापसंकल्प सोडूनि द्यावा ।
मना सत्यसंकल्प जीवीं धरावा ॥
मना कल्पना ते नको वीषयांची ।
विकारे घडे हो जनी सर्व ची ची ॥ ५॥

पापसंकल्प सोडून सत्यसंकल्प जीवात धरावा. विषयांची कल्पना नको, कारण त्यातून जगात विकारच घडतात.

- समर्थ रामदास