मनाचे श्लोक

नसे अंतरी काम नानाविकारी

मनाचे श्लोक ५०.

नसे अंतरी काम नानाविकारी ।
उदासीन जो तापसी ब्रह्मचारी ॥
निवाला मनीं लेश नाही तमाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५०॥

ज्याच्या मनात नाना विकारी काम नाही, जो उदासीन तापसी आणि ब्रह्मचारी आहे, आणि ज्याच्या मनात तमाचा लेश नाही, तो दास जगात धन्य आहे.

- समर्थ रामदास