मनाचे श्लोक

मदें मत्सरें सांडिली स्वार्थबुद्धी

मनाचे श्लोक ५१.

मदें मत्सरें सांडिली स्वार्थबुद्धी ।
प्रपंचीक नाहीं जयातें उपाधी ॥
सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५१॥

मद, मत्सर आणि स्वार्थबुद्धी सोडली, ज्याला प्रपंचाची उपाधी नाही, आणि जो नेहमी नम्र सुवाचा बोलतो, तो दास जगात धन्य आहे.

- समर्थ रामदास