मनाचे श्लोक

सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकीं

मनाचे श्लोक ५३.

सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकीं ।
सदा सर्वदा सत्यवादी विवेकी ॥
न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५३॥

जो सर्व लोकांत आर्जव प्रीती ठेवतो, नेहमी सत्यवादी आणि विवेकी आहे, आणि मिथ्या कधी बोलत नाही, तो दास जगात धन्य आहे.

- समर्थ रामदास