मनाचे श्लोक

सदा सेवि आरण्य तारुण्यकाळीं

मनाचे श्लोक ५४.

सदा सेवि आरण्य तारुण्यकाळीं ।
मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी ॥
चळेना मनीं निश्चयो दृढ ज्याचा ।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५४॥

तारुण्यकाळी अरण्य सेवणारा, कल्पनेच्या मेळाला न मिळणारा, आणि ज्याचा निश्चय डगमगत नाही, तो दास जगात धन्य आहे.

- समर्थ रामदास