मनाचे श्लोक

नसे मानसीं नष्ट आशा दुराशा

मनाचे श्लोक ५५.

नसे मानसीं नष्ट आशा दुराशा ।
वसे अंतरीं प्रेमपाशा पिपाशा ॥
ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५५॥

नष्ट आशा आणि दुराशा मनात नाही. आत प्रेमाची पिपासा आहे. भक्तीभावाने देव ऋणी होतो त्याचा. तो दास जगात धन्य आहे.

- समर्थ रामदास