दिनाचा दयाळू मनाचा मवाळू ।
स्नेहाळू कृपाळू जनीं दासपाळू ॥
तया अंतरी क्रोध संताप कैंचा ।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५६॥
दिनांचा दयाळू, मनाचा मवाळ, स्नेहाळू, कृपाळू आणि दासपाळू. त्याच्या आत क्रोध आणि संताप कोठून येणार. तो दास जगात धन्य आहे.
- समर्थ रामदास