जगीं होइजे धन्य या रामनामे ।
क्रिया भक्ति ऊपासना नित्य नेमे ॥
उदासीनता तत्त्वता सार आहे ।
सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ॥ ५७॥
रामनामाने जगात धन्य व्हावे. क्रिया, भक्ती आणि उपासना नित्य नेमाने करावी. उदासीनता हा सार आहे. वृत्ती नेहमी मोकळी राहावी.
- समर्थ रामदास