मना कल्पना कल्पितां कल्पकोटी ।
नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी ॥
मनीं कामना राम नाही जयाला ।
अती आदरे प्रीती नाही तयाला ॥ ५९॥
कल्पना कल्पकोटी कल्पिल्या तरी रामाची भेट होत नाही. ज्याला मनात रामाची कामना नाही, त्याला आदराने प्रीती नाही.
- समर्थ रामदास