मना राम कल्पतरु कामधेनु ।
निधी सार चिंतामणी काय वानूं ॥
जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता ।
तया साम्यता कायसी कोण आतां ॥ ६०॥
राम कल्पतरु आहे, कामधेनु आहे, निधी आहे आणि चिंतामणी आहे. त्याच्या योगाने सर्व सत्ता घडते. त्याला कोण समान.
- समर्थ रामदास