मनाचे श्लोक

घरी कामधेनू पुढें ताक मागें

मनाचे श्लोक ६३.

घरी कामधेनू पुढें ताक मागें ।
हरीबोध सांडोनि वेवाद लागे ॥
करी सार चिंतामणी काचखंडे ।
तया मागतां देत आहे उदंडे ॥ ६३॥

घरी कामधेनु असून पुढे ताक मागतो. हरीचा बोध सोडून वाद लावतो. चिंतामणीचे काचखंड करतो, तरी मागितले ते उदंड देत आहे.

- समर्थ रामदास