मनाचे श्लोक

अती मूढ त्या दृढ बुद्धि असेना

मनाचे श्लोक ६४.

अती मूढ त्या दृढ बुद्धि असेना ।
अती काम त्या राम चित्ती वसेना ॥
अती लोभ त्या क्षोभ होइल जाणा ।
अती वीषयी सर्वदा दैन्यवाणा ॥ ६४॥

अति मूढाची बुद्धी दृढ नसते. अति कामाच्या चित्ती राम वसत नाही. अति लोभाने क्षोभ होतो. अति विषयात नेहमी दैन्य असते.

- समर्थ रामदास