मनाचे श्लोक

नको दैन्यवाणें जिणे भक्तिऊणे

मनाचे श्लोक ६५.

नको दैन्यवाणें जिणे भक्तिऊणे ।
अती मुर्ख त्या सर्वदा दु:ख दूणे ॥
धरीं रे मना आदरें प्रीति रामी ।
नको वासना हेमधामीं विरामीं ॥ ६५॥

भक्ती उणी असता दीनपणाने जगू नये. अति मूर्खाला दुःख दुप्पट असते. आदराने रामात प्रीती धर. हेमधामी वासना नको.

- समर्थ रामदास