मनाचे श्लोक

घनश्याम हा राम लावण्यरुपी

मनाचे श्लोक ६७.

घनश्याम हा राम लावण्यरुपी ।
महाधीर गंभीर पूर्णप्रतापी ॥
करी संकटीं सेवकांचा कुडावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ६७॥

घनश्याम राम लावण्यरूपी आहे, धीर, गंभीर आणि पूर्णप्रतापी आहे. संकटात सेवकांचा कुडावा करतो. पहाटे मनात राम चिंतीत जावा.

- समर्थ रामदास