मनाचे श्लोक

बळें आगळा राम कोदंडधारी

मनाचे श्लोक ६८.

बळें आगळा राम कोदंडधारी ।
महाकाळ विक्राळ तोही थरारी ॥
पुढे मानवा किंकरा कोण केवा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ६८॥

धनुष्यधारी राम बळाने आगळा आहे. महाकाळ विक्राळही त्यापुढे थरथरते. किंकर कोण आणि केव्हा, हे मानावे. पहाटे मनात राम चिंतीत जावा.

- समर्थ रामदास