सुखानंदकारी निवारी भयातें ।
जनीं भक्तिभावे भजावे तयातें ॥
विवेके त्यजावा अनाचार हेवा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ६९॥
तो सुख आणि आनंद करतो, भय निवारतो. त्याला भक्तीभावाने भजावे. विवेकाने अनाचार आणि हेवा टाकावा. पहाटे मनात राम चिंतीत जावा.
- समर्थ रामदास