मनाचे श्लोक

सदा रामनामे वदा पुर्णकामें

मनाचे श्लोक ७०.

सदा रामनामे वदा पुर्णकामें ।
कदा बाधिजेना ऽऽ पदा नित्य नेमें ॥
मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७०॥

रामनाम पूर्णकामाने नेहमी वदावे. नित्य नेमाने पदी बाधा येत नाही. मद आणि आळस सोडून द्यावा. पहाटे मनात राम चिंतीत जावा.

- समर्थ रामदास