मनाचे श्लोक

जयाचेनि नामें महादोष जाती

मनाचे श्लोक ७१.

जयाचेनि नामें महादोष जाती ।
जयाचेनि नामें गती पाविजेती ॥
जयाचेनि नामें घडे पुण्यठेवा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७१॥

ज्याच्या नामाने महादोष जातात, गती पावली जाते, आणि पुण्याचा ठेवा घडतो, त्या रामाचे पहाटे चिंतन करावे.

- समर्थ रामदास