न वेचे कदा ग्रंथचि अर्थ काही ।
मुखे नाम उच्चारितां कष्ट नाहीं ॥
महाघोर संसारशत्रु जिणावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७२॥
ग्रंथाचा अर्थ वेचण्याचा कष्ट नाही. मुखाने नाम उच्चारता कष्ट नाही. संसाराचा घोर शत्रू जिंकायचा असेल तर पहाटे मनात राम चिंतीत जावा.
- समर्थ रामदास