मनाचे श्लोक

देहेदंडणेचे महादु:ख आहे

मनाचे श्लोक ७३.

देहेदंडणेचे महादु:ख आहे ।
महादु:ख तें नाम घेता न राहे ॥
सदाशीव चिंतीतसे देवदेवा ।
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ७३॥

देह दंडण्याचे महादुःख आहे, पण नाम घेतले की ते राहत नाही. सदाशिव देवदेवाचे चिंतन करतो. पहाटे मनात राम चिंतीत जावा.

- समर्थ रामदास