मनाचे श्लोक

बहुतांपरी संकटे साधनांची

मनाचे श्लोक ७४.

बहुतांपरी संकटे साधनांची ।
व्रते दान उद्यापने ती धनाची ॥
दिनाचा दयाळू मनी आठवावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७४॥

साधनांची संकटे खूप आहेत. व्रत, दान आणि उद्यापन ही धनाची आहेत. दिनांचा दयाळू मनात आठवावा. पहाटे मनात राम चिंतीत जावा.

- समर्थ रामदास