नव्हे कर्म ना धर्म ना योग कांही ।
नव्हे भोग ना त्याग ना सांग पाहीं ॥
म्हणे दास विश्वास नामी धरावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७६॥
कर्म नाही, धर्म नाही, योग नाही, भोग नाही, त्याग नाही. दास म्हणतो, विश्वासाचे नाम धरावे. पहाटे मनात राम चिंतीत जावा.
- समर्थ रामदास