मनाचे श्लोक

करी काम निष्काम या राघवाचे

मनाचे श्लोक ७७.

करी काम निष्काम या राघवाचे ।
करी रुप स्वरुप सर्वां जिवांचे ॥
करि छंद निर्द्वद्व हे गुण गातां ।
हरीकीर्तनी वृत्तिविश्वास होतां ॥ ७७॥

रामाचे काम निष्काम करावे. रूप हे सर्वांच्या जीवांचे स्वरूप आहे. गुण गाता निर्द्वंद्व छंद करावा. हरीकीर्तनात वृत्ती विश्वासाने रहावी.

- समर्थ रामदास