अहो ज्या नरा रामविश्वास नाहीं ।
तया पामरा बाधिजे सर्व कांही ॥
महाराज तो स्वामि कैवल्यदाता ।
वृथा वाहणें देहसंसारचिंता ॥ ७८॥
ज्या नराचा रामावर विश्वास नाही, त्या पामराला सारे बाधते. स्वामी कैवल्यदाता आहे. देह आणि संसाराची चिंता व्यर्थ वाहणे आहे.
- समर्थ रामदास