मनाचे श्लोक

मना पावना भावना राघवाची

मनाचे श्लोक ७९.

मना पावना भावना राघवाची ।
धरी अंतरीं सोडिं चिंता भवाची ॥
भवाची जिवा मानवा भूलि ठेली ।
नसे वस्तुचि धारणा व्यर्थ गेली ॥ ७९॥

रामाची भावना पावन आहे. भवाची चिंता आतून सोडा. भवाची भूळ जीवामनात ठेवली, आणि वस्तूची धारणा व्यर्थ गेली.

- समर्थ रामदास