देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी ।
मना सज्जना हेचि क्रीया धरावी ॥
मना चंदनाचे परी त्वां झिजावे ।
परी अंतरीं सज्जना नीववावे ॥ ८॥
देह सोडताना कीर्ती मागे उरावी. चंदनासारखे झिजावे, पण आतून सज्जनांना शांत करावे. हीच क्रिया धरावी.
- समर्थ रामदास