मनाचे श्लोक

मना मत्सरे नाम सांडूं नको हो

मनाचे श्लोक ८१.

मना मत्सरे नाम सांडूं नको हो ।
अती आदरे हा निजध्यास राहो ॥
समस्तांमधे नाम हे सार आहे ।
दुजी तूळणा तूळितांही न साहे ॥ ८१॥

मत्सराने नाम सोडू नको. हा निजध्यास आदराने राहो. सर्वांमध्ये नाम हे सार आहे. दुसरी तुलना केली तरी साहणार नाही.

- समर्थ रामदास