मनाचे श्लोक

भजा राम विश्राम योगेश्वरांचा

मनाचे श्लोक ८५.

भजा राम विश्राम योगेश्वरांचा ।
जपू नेमिला नेम गौरीहराचा ॥
स्वये नीववी तापसी चंद्रमौळी ।
तुम्हां सोडवी राम हा अंतकाळीं ॥ ८५॥

योगेश्वरांचा विश्राम, राम, भजावा. गौरीहराचा नेम जपायला नेमला आहे. चंद्रमौळी तापसी स्वतः निववतो. अंतकाळी राम तुम्हाला सोडवतो.

- समर्थ रामदास