मनाचे श्लोक

मुखी राम त्या काम बाधुं शकेना

मनाचे श्लोक ८७.

मुखी राम त्या काम बाधुं शकेना ।
गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना ॥
हरीभक्त तो शक्त कामास भारी ।
जगीं धन्य तो मारुती ब्रह्मचारी ॥ ८७॥

मुखी राम असेल तर काम बाधू शकत नाही. गुणात धैर्य चुकत नाही. हरीभक्त कामास भारी आणि शक्त असतो. मारुती ब्रह्मचारी जगात धन्य आहे.

- समर्थ रामदास