मनाचे श्लोक

बहू चांगले नाम या राघवाचे

मनाचे श्लोक ८८.

बहू चांगले नाम या राघवाचे ।
अती साजिरे स्वल्प सोपे फुकाचे ॥
करी मूळ निर्मूळ घेता भवाचे ।
जिवां मानवां हेंचि कैवल्य साचें ॥ ८८॥

रामाचे नाम चांगले, साजिरे, स्वल्प, सोपे आणि फुकट आहे. ते भवाचे मूळ उपटते. जीवांमनांना हेच खरे कैवल्य आहे.

- समर्थ रामदास