मनाचे श्लोक

जनीं भोजनी नाम वाचे वदावें

मनाचे श्लोक ८९.

जनीं भोजनी नाम वाचे वदावें ।
अती आदरे गद्यघोषे म्हणावे ॥
हरीचिंतने अन्न सेवीत जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें ॥ ८९॥

जेवताना वाचेने नाम वदावे, आदराने गद्यघोषाने म्हणावे. हरीच्या चिंतनाने अन्न सेवत जावे. तसे केले की श्रीहरी आपोआप लाभतो.

- समर्थ रामदास