न ये राम वाणी तया थोर हाणी ।
जनीं व्यर्थ प्राणी तया नाम कोणी ॥
हरीनाम हें वेदशास्त्रीं पुराणीं ।
बहू आगळे बोलिली व्यासवाणी ॥ ९०॥
वाणीत राम येत नसेल तर थोर हानी आहे. व्यर्थ प्राण्याला नाम कोण. हरिनाम वेद, शास्त्र आणि पुराणात आहे. व्यासवाणीने ते आगळे बोलले आहे.
- समर्थ रामदास