मनाचे श्लोक

नको वीट मानूं रघुनायकाचा

मनाचे श्लोक ९१.

नको वीट मानूं रघुनायकाचा ।
अती आदरे बोलिजे राम वाचा ॥
न वेंचे मुखी सांपडे रे फुकाचा ।
करीं घोष त्या जानकीवल्लभाचा ॥ ९१॥

रघुनायकाचा वीट मानू नये. आदराने राम वाचेने बोलावा. मुखी फुकट सापडते, वेच लागत नाही. जानकीवल्लभाचा घोष करा.

- समर्थ रामदास