मनाचे श्लोक

तिन्ही लोक जाळुं शके कोप येतां

मनाचे श्लोक ९४.

तिन्ही लोक जाळुं शके कोप येतां ।
निवाला हरु तो मुखे नाम घेतां ॥
जपे आदरें पार्वती विश्वमाता ।
म्हणोनी म्हणा तेंचि हे नाम आतां ॥ ९४॥

कोप आला तर तीन लोक जाळू शकतो, पण मुखाने नाम घेतले की हर निवतो. पार्वती विश्वमाता आदराने जपते. तेच नाम आता म्हणा.

- समर्थ रामदास