मनाचे श्लोक

महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळीं

मनाचे श्लोक ९६.

महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळीं ।
जपे रामनामावळी नित्यकाळीं ॥
पिता पापरुपी तया देखवेना ।
जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना ॥ ९६॥

दैत्यकुळातील प्रल्हाद नित्य रामनामावली जपतो. पापरूपी पिता ते पाहू शकत नाही. तो दैत्य मुखाने नाम म्हणत नाही.

- समर्थ रामदास