मुखी नाम नाहीं तया मुक्ति कैंची ।
अहंतागुणे यातना ते फुकाची ॥
पुढे अंत येईल तो दैन्यवाणा ।
म्हणोनि म्हणा रे म्हणा देवराणा ॥ ९७॥
मुखी नाम नसेल तर मुक्ती कोठे. अहंतेने यातना फुकट येतात. पुढे अंत येईल तेव्हा दीन व्हाल. देवराणा म्हणा.
- समर्थ रामदास