मनाचे श्लोक

हरीनाम नेमस्त पाषाण तारी

मनाचे श्लोक ९८.

हरीनाम नेमस्त पाषाण तारी ।
बहु तारीले मानवी देहधारी ॥
तया रामनामीं सदा जो विकल्पी ।
वदेना कदा जीव तो पापरूपी ॥ ९८॥

हरिनाम नेमके असले की पाषाण तारतो, आणि खूप देहधारी माणसे तारली. जो रामनामात नेहमी विकल्प करतो, तो पापरूपी जीव कधी वदत नाही.

- समर्थ रामदास