जगीं धन्य वाराणसी पुण्यराशी ।
तयेमाजि आतां गतीं पूर्वजांसी ॥
मुखे रामनामावळी नित्य काळीं ।
जिवा हित सांगे सदा चंद्रमौळी ॥ ९९॥
वाराणसी पुण्यराशी धन्य आहे. तेथे पूर्वजांना गती आहे. मुखे रामनामावली नित्य म्हणावी. चंद्रमौळी नेहमी जीवाचे हित सांगतो.
- समर्थ रामदास