बुधीहाळ किला बाका ॥ दुरुन टाकी तोफाचे गोळे ॥ जसा अग्रीचा दिसतो लोळ ॥ श्रीमंताचे पुण्य प्रबळ ॥ सोडी तकटी निशान ॥ जातां जातां बसे वलगण ॥ चिनकहाळ्ळी माहाबळ्ळी जेर केली मौजेने ॥ किल्ला घेतला तमाशानें ॥ भोवती जेर करोनी कशी घेतली विशाळ ॥ अवघा प्राक्तनाचा खेळ !॥१॥
तेथून पुढ नंदिगड घेतलें बाळापूर ॥ नागमंगळ जागा थोर मुळबागळ ॥ किल्ला बाका घटकेंत केला जेर ॥ शहा दिला बेंगरुळावर ॥ बहिरवदुर्ग आणि मांगडी पाहातां फिरती डोळे ॥ भोंवती झाडी अतिप्रबळ ॥२॥
देवराय - दुर्ग भोंवते किल्ले घेतले प्रतापान ॥ पुढुनी जंगल महा - दारुण ॥ हालाकरितां बहुत पडिले लोक तमाशानें ॥ खराबी फार केली किल्ल्यानें ॥ मारून गोळ्या झोळिस लोळ्या लाविल्या तुंबळ ॥ शेवटी जेर केलें स्थळ ॥३॥
नळ - वाटेने पोटें फुगती. प्राण उरतो डोळा ॥ म्हणती कसे आले कपाळा ? ॥ हागवणेनं व्याकुळ झाले वाहे बुळ बुळा ॥ भारी कर्नाटक उन्हाळा ! ॥ जेव्हा घरची आठवण होती तेव्हा रडे मुळमुळा ! ॥ कशी आठवती मुलेबाळे ! ( कसे आठवती मुलांबाळा ) ॥४॥
आजपासुन कर्नाटकची नको चाकरी, हारी ! ॥ शेत करुनि राहू घरीं ॥ रेती खातां पाणि लागतें सुख नाहीं शरींरी ॥ मोठि माहागाइ पडली भारी ! ॥ बाबु सवाई रामापाई कवि मत - वाला खेळ ॥ जबुन हे कर्नाटकाचें जळ ॥५॥
या पोवाड्यात सांगितले आहे. बुधीहाळ किला बाका दुरुन टाकी तोफाचे गोळे जसा अग्रीचा दिसतो लोळ श्रीमंताचे पुण्य प्रबळ सोडी तकटी निशान जातां जातां बसे वलगण चिनकहाळ्ळी माहाबळ्ळी जेर केली मौजेने किल्ला घेतला तमाशानें भोवती जेर करोनी कशी घेतली विशाळ अवघा प्राक्तनाचा खेळ !. पुढे तेथून पुढ नंदिगड घेतलें बाळापूर नागमंगळ जागा थोर मुळबागळ किल्ला बाका घटकेंत केला जेर शहा दिला बेंगरुळावर बहिरवदुर्ग आणि मांगडी पाहातां फिरती डोळे भोंवती झाडी अतिप्रबळ. शेवटी.
- पारंपरिक