पोवाडा

एका खडी बोला कशि गत झाली

पारंपरिक मराठी पोवाडा.

एका खडी बोला कशि गत झाली बाजीला ॥ध्रु०॥
कक काशिबाई गहिंवरे । खख खबर गेली पुणियारे ॥ गग गाय जशि हंबरे । घरोघरी झाला कहार ॥ देव कोपला ॥कशि०॥ ॥१॥
नाना पुसतसे आपाला । चिमाजी गहिंवरे दाटला ॥ छछ छत्र होतें आम्हांला । जज जनम थोडा जाहला ॥ पहाड पडला ॥कशि०॥ ॥२॥
झझ झडकुनी आलें मरण । या देवाने केला खुन ॥ टट टोडूनी नेलें रतन । ठठ ठार झाला प्राण । नरमदेला ॥कशि०॥ ॥३॥
डवलतेचा खांब होता ॥ ढढरणीवर पडला आतां ॥ णाणा म्हणे ’कुठेपाहु पिता । ततारा झमकत होता ॥ अंधकळा’ ॥कशि०॥ ॥४॥
थथरकत बाजी बहिरी । ददलांत मोंगलावरी ॥ धधरुनि मोरचे मारी । नाना म्हणे श्रीहरी ॥ वैराकार केला ॥कशि०॥ ॥५॥
पपप्यार शाहूराजाचा । फफरारा जरताचा ॥ बबाळाजी बाप त्याचा । भारांत उमराव दक्षिणेचा ॥ मोहरा गेला ॥कशि०॥ ॥६॥
माय म्हणे बाजीरायासी । रंगमाहाली कधीं बैससी ॥ लोलाविला सर्वासी । अंतरला ॥कशि०॥ ॥७॥
ववजावुनी बैसला वनीं । सससाया धरली कुणी । खलवीत जन गेले टाकुनी । शाशा शाहीर वर्णील गुणी । उमरावाला ॥कशि०॥ ॥८॥
हा पवाडा बाजीरायाचा । अलंक्षा एका गाखडी गायाचा । झाडा जाहला अक्षरांचा । साळी त्रिंबक श्रीगोंद्याचा । अभंगाला ॥कशि०॥ ॥९॥

या पोवाड्यात सांगितले आहे. एका खडी बोला कशि गत झाली बाजीला ध्रु० कक काशिबाई गहिंवरे , खख खबर गेली पुणियारे गग गाय जशि हंबरे , घरोघरी झाला कहार देव कोपला कशि०. पुढे नाना पुसतसे आपाला , चिमाजी गहिंवरे दाटला छछ छत्र होतें आम्हांला , जज जनम थोडा जाहला पहाड पडला कशि०. शेवटी हा पवाडा बाजीरायाचा , अलंक्षा एका गाखडी गायाचा , झाडा जाहला अक्षरांचा , साळी त्रिंबक श्रीगोंद्याचा , अभंगाला कशि०.

- पारंपरिक