पुणे शहर किलवाणी दिसती जागा । करुणा कां येईना तुला अरे श्रीरंगा ॥ध्रु०॥
जाऊन राव राहिले ब्रह्मावर्ती । वनचरा हातें पृथ्वी केली निक्षेत्री ॥ एका प्राण्याहून सुन्य दिसे धरत्री । रयतेला लागला वनवा जळती अंत्री ॥ रायाचे आश्रमीं ब्राह्मण गायत्री । कशी एकाएकी झाली धन्य कळसुत्री ॥ शाहु छत्रपतीचे देणें गेलें भंगा । व्याघ्राचें घरामधीं जंबुक करितो दंगा ॥पुणें०॥ ॥१॥
काही योग्यता नाहीं राजेशाला । पंचामृत माहित. नवतें मोशीम शाला । चवरंग पलंग तरी गेले ! किंमत खुर्च्याला । उन्माद सदां धुंदी मर्धी दारू निशाला ॥ भरगच्ची मंदील, चिरे, शाल, दुशाला । आल्या डगल्या टोप्या कंदील नाहि मशाला ॥ पालख्या अबदागिरी गेल्या माद्वन पागा । झाले मेणा छत्र्या जागोजागा ॥पुणे०॥ ॥२॥
दक्षिणचें मंगळसूत्र कोठें दडलें?। मध्यभागी जाऊन समुद्री जहाज बुडलें । वनवास आला नळराया तसें हें घडलें कसे एकाएकी शिरीं आकाश कडकडलें ॥ मसलत करूनी बारांनी मधी सोडविले । आले निघून वनवासीं हो राव राहिले ॥ तूं बौध्य होऊन बसलाशी पांडुरंगा ॥ अझुन सत्त्व किती पाहाशी होशील जागा ॥ करुणा का येईना तुला अरे श्रीरंगा ॥पुणे०॥ ॥३॥
रायाचे मनामर्धी नवतें दुजेपण कांही । भरी घालून चुहंकडे गेले च्यार बाराभाई । चौमुलखी दर्प जयाचा कीर्त सवाई ॥ हा दर्प लोपला पर्वताची रायी । असे कधीच नवतें झालें होती लाखो शाई ॥ घटकेंत बुडाला सरली ज्याची कमाई । कवी विठ्ठल मोरू म्हणें पहावें सोंगा ॥ गुणी मोतीराम म्हणे सादर व्हावे प्रसंगा ॥पुणे०॥ ॥४॥
या पोवाड्यात सांगितले आहे. पुणे शहर किलवाणी दिसती जागा , करुणा कां येईना तुला अरे श्रीरंगा ध्रु० जाऊन राव राहिले ब्रह्मावर्ती , वनचरा हातें पृथ्वी केली निक्षेत्री एका प्राण्याहून सुन्य दिसे धरत्री , रयतेला लागला वनवा जळती अंत्री रायाचे आश्रमीं ब्राह्मण गायत्री , कशी एकाएकी झाली धन्य कळसुत्री शाहु छत्रपतीचे देणें गेलें भंगा , व्याघ्राचें घरामधीं जंबुक करितो दंगा पुणें०. पुढे काही योग्यता नाहीं राजेशाला , पंचामृत माहित. नवतें मोशीम शाला , चवर.
- पारंपरिक