शाहूमहाराज शिव झाला । अवतार खचला ॥ध्रु०॥
ज्याचें अवघें ऐवढें त्रिभुवन । सुख पावले जन ॥ निर्दाळिले शत्रू दुसमान । मोंगलाई तुरुकान ॥ हाबशी कापती ज्याच्या धाकाला ॥१॥
शुक्रवार दिन चांगला ॥ शाहू मुक्त पावला ॥ नगरी धुंधकार पडला ॥ ऐसा मोहरा । घेउनी चला रे माहुलीला ॥२॥
सखु कदमाची बोलली । धनीन चालली ॥ सती निघते म्हणून बोलली जाऊनी हौद्यांत बैसली ॥ “घेऊन चला रे ह्या शाहूला” ॥३॥
घनीन बोलली लोकांला । “शाहू मुक्त पावला ॥ बेगी बोलावा पेशव्याला चौकण द्या रे चोरटयाला । दुःख देऊ नये रयतेला ॥ कैस करा शिरक्याला । शाहू होता तो निधून गेला” ॥४॥
धनीन सकवार बैसून । कीर्त केली तीन ॥ गेली वैकुंठा भुवन । शाहूसी घेऊन । इंद्रे जयजयकार मांडिला ॥५॥
नाना चालले सरदार । आणि एक उमराव ॥ अग्र दिली हो संगमावर मोठा झाला काहार । दादू चातुर बोलला ॥६॥
या पोवाड्यात सांगितले आहे. शाहूमहाराज शिव झाला , अवतार खचला ध्रु० ज्याचें अवघें ऐवढें त्रिभुवन , सुख पावले जन निर्दाळिले शत्रू दुसमान , मोंगलाई तुरुकान हाबशी कापती ज्याच्या धाकाला. पुढे शुक्रवार दिन चांगला शाहू मुक्त पावला नगरी धुंधकार पडला ऐसा मोहरा , घेउनी चला रे माहुलीला. शेवटी नाना चालले सरदार , आणि एक उमराव अग्र दिली हो संगमावर मोठा झाला काहार , दादू चातुर बोलला.
- पारंपरिक