श्रीमंत बाजीराव कन्हया श्रीकृष्ण आठवा आवतार जन सेवक स्वामीच्या प्रसगी आयेकुन घ्यावे निरंतर ॥ रामभकत रुपराम चौधरी सावळी मूरत मणुहार । धने शुर रणशूर पांडववंशामधि पारथवीर ॥ दादा (सा) यबासंगे लडाया घेतल्या रावाबरोबर । निज्यामआली ज्यार केला पाहा राक्षेसभवनावर ॥ कोपरगावी भील कापले नाही राहिला ठिकाना । येकायकी रतण हारपले कसे कोपला भगवाना ॥ध्रुपद॥ ॥१॥
सुभेदार रुपराम चवधरी च्यातुर यक मोतीदाना । येकायकी रतण हारपले कसे कोपला भगवाना ॥ मिरजवाले राव रास्ते गुण घेती सिंदेस्याई । ईंचुरकर आणि बापु गोखले रणि जानती होलकर स्याई ॥ रुपरामचा सर्मजाम बिनमोल कृत ठाई ठाई । रेणु रेखले सतर शुतारनाला तो सिगता नाई ॥ छोटेखानी बाग बनविला फुलबागाची चेतुराई । नेला बंब नळ वाढुन आणिला सेहर पुन्यामधि सवाई ॥ मुरत गेली फिरत राहिली हेच मागणे श्रीकृष्ण ॥२॥
डोळ्यास आणून पानी आपा दादासी बोलाविले । आता आम्ही काही वाचत नाही ब्रह्मलिखत करमी लोहिले ॥ श्रीमंतासी करा हिनती माहाल मुलुक घ्यावे आपले । सोडचिठया आपहास्तें दिधल्या। पाळिक लोक मनिं घाबरले ॥ बाबासाहेब धनी कृपाळू पत्र पाहताच संतोसले । स्याहानपनाची रीत वळकली सवस्थान राखुन ठिविले ॥ उमाबाई व रमाबाईला सांगा नका करू रोजना ॥३॥
श्रीमंताने वस्त्र दिले बोलावुन रामचंद्रासी । सिरी ठेविला हात. ‘शुकी संभाळांवे सवस्थानासी’ । हि...आखर जाला र पडरीच्या राना ॥ शुभेदार रुपराम चौधरी च्यातुर मोतीदाना । येकायकी रतन हारपले कसे कसे कोपला भगवाना ॥४॥
या पोवाड्यात सांगितले आहे. श्रीमंत बाजीराव कन्हया श्रीकृष्ण आठवा आवतार जन सेवक स्वामीच्या प्रसगी आयेकुन घ्यावे निरंतर रामभकत रुपराम चौधरी सावळी मूरत मणुहार , धने शुर रणशूर पांडववंशामधि पारथवीर दादा (सा) यबासंगे लडाया घेतल्या रावाबरोबर , निज्यामआली ज्यार केला पाहा राक्षेसभवनावर कोपरगावी भील कापले नाही राहिला ठिकाना , येकायकी रतण हारपले कसे कोपला भगवाना ध्रुपद. पुढे सुभेदार रुपराम चवधरी च्यातुर यक मोतीदाना , येकायकी रतण हारपले कसे कोपला भगवान.
- पारंपरिक