पोवाडा

श्रिमंत झाले लोक श्रिमंता

पारंपरिक मराठी पोवाडा.

श्रिमंत झाले लोक श्रिमंतापासून लक्षावधी ॥ दुरावले श्रीमंत आपल्या दृष्टिस पडतिल कधी ॥ध्रुवपद॥
शिंदे होळकर उत्तरेस पश्चिमेस सेनापती ॥ पूर्वेकडे भोंसले, मिरजकर दक्षिणचे अधिपती ॥ हरीपंत नानाच्यापुढे किति बुद्धिवान लोपती ॥ बृहस्पती आणि शुक्र जसे काय तारांगणिं तळपती ॥ विपूल त्या रास्त्याच्या घरीं आजवर संपत संतती ॥ इचलकर्जिकर बारामतीकर सोयर्‍यांत धनपती ॥(चाल)॥ पाहा कृष्णराव चासकर ॥ कोकणचे कोल्हटकर ॥ महाशूर सोलापूरकर ॥ दीक्षित पेठे साठे ओक ओंकार सभाग्यामधिं ॥ फाटक थत्ते बरवे देवधर, पेंडशांची रित सुधी ॥१॥दुरा०॥
भागवत मंडलिक दामले रामदुर्गकर बळी ॥ आपा बळवंत पार जाइ रणांत फोडुन फळी ॥ रामाजी माहादेव रणांगणी अडेल मोठे खळी ॥ हमेशा कारलेकर देती भिल्ल कोळ्यांना गळीं ॥ झांशिवाले बिनिवाले बुंदेले रिपु खांडेकर छळी ॥ कितीक लक्षाधीश प्रतिष्ठित ही घरची मंडळी ॥चाल॥ मर्दाने विंचूरकर भरपूर नारो शंकर ॥ विश्वासुक ओढेकर ॥चाल॥ नायगांवकर पुरंदरे प्रतिश्रिमंत ते गुणनिधी ॥ सखाराम भगवंत राजकारणांत केवळ विधी ॥२॥दुरा०॥
नगरकर आंबेकर चिंतो विठ्ठल स्वारीकडे ॥ पवार जाधव धुमाळ डफळे देवकांते धायगुडे ॥ दरेकर सरलष्कर बाबर सोनवणी पायगुडे ॥ निंबाळकर नाईक धायबर पाटणकर फांकडे ॥ मुधोळ गुत्ती गजेंद्रगडकर स्वस्थानी घोरपडे ॥ गुजर घाटगे माहाडिक मोहिते विचारे शिर्के बडे ॥चाल॥ बाइ माने म्हसवडकर ॥ आठवले उंबरखेडकर ॥ रणनवरे राजवडकर ॥ पिसाळ शितोळे वाघ आयतुळे लढाईला ते आधी ॥ शाहामिरखां रोहिले, फिरंगी, पठाण, आरब, सिधी ॥३॥दुरा०॥
ताकपीर थोरात पांढरे स्वामीपदिं सादर ॥ धुळप यांचा इंग्रज टोपी काढून करति आदर ॥ श्रीमंतांचे प्रतिबिंब अल्ली बाहादर समशेर बाहादर ॥ कुशाबा हैबतशिंग सजेले काय रुप सुंदर ॥ सातारकर पोतनीस मुख्य चिटणीस लेखक नादर ॥ छत्रपतिस विनवून देविती श्रीमंतांस चादर ॥चाल॥ निळकंठराव धारकरी संनिध त्याची चाकरी ॥ मोहीस हैबतराव करी ॥ बाबुराव हरी सखाराम हरि शूर वीरांचे क्षुधी ॥ अहंकारी मल्हारराव जगजीवन नसे परबुधी ॥४॥दुरा०॥
धन्य प्रभु पेशवे ज्याचे ऐश्वर्य बघुन मन रिझे ॥ परशत्रूचें शौर्य ठांइच्या ठांई प्रसंगीं थिजे ॥ सुखी लोक मुलखांत केशरी भात घरोघर शिजे । गृहस्थ भिक्षुकांचें गौरवें तुपांत मनगट भिजे ॥ तीर्थोतीर्थी नित्य शेरभर सोने सकाळी झिजे ॥ नाहिं दुःख कोणास पलंगी आनंदांत जन निजे ॥चाल॥ ईश्वरा असे हे धनी ॥ महा पराक्रमी साधनी ॥ सर्वत्र सगुण शोधुनी ॥ गंगु हैबती म्हणे यजाचे विघ्न गजानन वधी ॥ महादेव गुणि प्रभाकराचे कवन शर्करा दुधीं ॥ श्रिमंत झाले लोक श्रिमंतांपासुन लक्षावधी ॥५॥

या पोवाड्यात सांगितले आहे. श्रिमंत झाले लोक श्रिमंतापासून लक्षावधी दुरावले श्रीमंत आपल्या दृष्टिस पडतिल कधी ध्रुवपद शिंदे होळकर उत्तरेस पश्चिमेस सेनापती पूर्वेकडे भोंसले, मिरजकर दक्षिणचे अधिपती हरीपंत नानाच्यापुढे किति बुद्धिवान लोपती बृहस्पती आणि शुक्र जसे काय तारांगणिं तळपती विपूल त्या रास्त्याच्या घरीं आजवर संपत संतती इचलकर्जिकर बारामतीकर सोयर्‍यांत धनपती (चाल) पाहा कृष्णराव चासकर कोकणचे कोल्हटकर महाशूर सोलापूरकर दीक्षित पेठे साठे ओक ओंक.

- पारंपरिक