पोवाडा

श्रीमंतमहाराज सवाई रावसाह

पारंपरिक मराठी पोवाडा.

श्रीमंतमहाराज सवाई रावसाहेब मोतीदाणा । खुप युक्तीनें राज्य राखिलें यशवंत फडणीस नाना ॥ ध्रु०॥
रतिवंत महाराज पेशवे माधव विष्णू अवतार । हिंदुस्थान कर्नाटक तेलंगण काबिज केलें सार ॥ घरिं बसल्या घरिं खंडण्या येती वृत्तांत ऐका साचार । शिंदे होळकर गाइकवाड नामी नमी सरदार ॥ जाट रोहिले पठाण कांपति राजे उदापूरचा राणा । खुप युक्तीनें०॥ ॥१॥
जरीपटक्याचें निशाण तात्या हरिपंताला सरदारी । चौखंडांमधिं घौंशा वाजतो कइकांला दहशत भारी ॥ हुजरातिची जिलीब चालती मानकरी सेना सारी ॥ पाटणकर घोरपडे निंबाळकर तलवारीचे धारकरी । अपाजि बळवंतराव शिपाईशाईमध्यें एक दाणा । खुप युक्तीनें०॥ ॥२॥
भले बुद्धीचे सागर नाना ऐसे नाही होणार । मर्दानें हो राज्य राखिलें मनसोबीच्या तलवार ॥ इंगेजाला खडे चारिले नाहीं लागुं दिअल थार । दर्यामंधीं पिटून घातले काय सांगू वारंवार ॥ बदामीचा किल्ला घेतला असा पुरुष नाहीं शहाणा । खुप युक्तीनें०॥ ॥३॥
भले बुद्धीचे सागर बुद्धीवंत बुद्धीचे सागर । दुष्टाचें निर्दाळण करुनि राज्य राखिलें एकछतर ॥ श्रीमंतांच्या वाडयामधीं सबनिस अण्णा खेडकर । कुल अखत्यारी बंदोबस्ती बाळाजीपंत ठोसर ॥ नानापरिचे विलास करितो जैसा गोकुळीं हा कहाना । खुप युक्तीनें०॥ ॥४॥
लक्ष धन्याचे पायीं चित्तापासुनि हा ज्याचा भाव । पहा राइचे पर्वत केले वाढिवले माधवराव ॥ लग्नासाठी आणले ज्यानें मोठे मोठे उमराव । जागजागीं दिल्या बैठला अनंत होतो उच्छाव ॥ तखतराया रथ ह्त्तीचा पुढें वाजे नौबतखाना । खुप युक्तीनें०॥ ॥५॥
राव बाजीचे पुण्य प्रतापी पुणें शहर केवळ काशी । गोब्राह्मणां प्रतिपाळितो दक्षिणा श्रावणमासीं ॥ टिकून धनया धन्य म्हणजे या पेशव्याच्या वंशाशीं । बाळा बहिरू करी कविता बसूनियां नित्य गासी ॥ सेवक सिताराम ज्यांचा दशनामीं भगवा बाणा । खुप युक्तीनें०॥ ॥६॥

या पोवाड्यात सांगितले आहे. श्रीमंतमहाराज सवाई रावसाहेब मोतीदाणा , खुप युक्तीनें राज्य राखिलें यशवंत फडणीस नाना ध्रु० रतिवंत महाराज पेशवे माधव विष्णू अवतार , हिंदुस्थान कर्नाटक तेलंगण काबिज केलें सार घरिं बसल्या घरिं खंडण्या येती वृत्तांत ऐका साचार , शिंदे होळकर गाइकवाड नामी नमी सरदार जाट रोहिले पठाण कांपति राजे उदापूरचा राणा , खुप युक्तीनें०. पुढे जरीपटक्याचें निशाण तात्या हरिपंताला सरदारी , चौखंडांमधिं घौंशा वाजतो कइकांला दहशत भारी हुजराति.

- पारंपरिक