तुझे गुणमी वर्णू किती छत्रपति । छत्रपति शिव झाला ॥ जैसा चंद्रमा लपाला । अवघा धुंधुकार पडला ॥ ज्यानें धनमाल सोडिला । गेला अंती तो झाला । इंद्रागती केली भक्ती ॥ तो शतयुगीचा सती । कीर्त सांगती ॥१॥
चारी दिशा भुल झाली । अवघी नगरी आकांतली ॥ कैशी गत शाहूला झाली । खाण रत्नाची खचली ॥ दोर खुटला तो पछि होऊन गेला । ह्याल सोडिला ॥ तो काळ कैसा हातचे हातीं ॥२॥
जसा गाईला घेरिला व्याघ्र । तैशी गत झाली सकवार ॥ शाहूसारखा शंकर । गेला खरा परतुन न ये संसारा । टाकुनिया पसारा सर्व जाती ॥३॥
कईकाचे गेलें अत्र । रडती संसारा कारण ॥ धनी समर्थ नारायण । जग पाळिलें, नाही कोण्डा छळिलें ॥ रत्न हरपलें तें, नाव त्याचें राहिले सर्वां चित्तीं ॥४॥
काय वर्णू तयाचे गुण । जैसा खेळ खेळला कृष्ण ॥ तैसें रूप गेलें झाकून झाले गुप्त । ते जनीं सांगती कीर्त साधुसंत ॥ ते मानवले भगवंत बरवे रीती ॥५॥
काशीहूनि एक राज । त्रिलोक्यांत नाव गर्गे ( गर्ज ) ॥ शाहूसारखा महाराज । होईना ऐसा धन्य धन्य स्वामी जगदीशा ! नेला कैसा । तो काळे घातला फांसा मोहनमती ॥६॥
छत्रपती पुण्यपावन । रयत रक्षिली आबादान ॥ घरोघर केलें सोनं अपरंपार ॥ कौल त्याचा करार । शाहू थोर महाराज जपमेश्वर ॥ जन ध्याती ॥७॥
जैसें रामानें केलें राज । तैं पद पावले महाराज ॥ काय वर्णु तयाचें तेज । फिरंगु नाना बोले सहज ॥ करितो भक्ती । मन भाव धरूनि चित्तीं ॥ तूं माझा हो भूपति । मज सारथी ॥८॥
या पोवाड्यात सांगितले आहे. तुझे गुणमी वर्णू किती छत्रपति , छत्रपति शिव झाला जैसा चंद्रमा लपाला , अवघा धुंधुकार पडला ज्यानें धनमाल सोडिला , गेला अंती तो झाला , इंद्रागती केली भक्ती तो शतयुगीचा सती , कीर्त सांगती. पुढे चारी दिशा भुल झाली , अवघी नगरी आकांतली कैशी गत शाहूला झाली , खाण रत्नाची खचली दोर खुटला तो पछि होऊन गेला , ह्याल सोडिला तो काळ कैसा हातचे हातीं. शेवटी जैसें रामानें केलें राज , तैं पद पावले महाराज काय वर्णु तयाचें तेज , फिरंगु.
- पारंपरिक