सुभाषित

आलस्यं हि मनुष्याणां

आळस हा मोठा शत्रू.

आलस्यं हि मनुष्याणां शरीरस्थो महान् रिपुः ।
नास्त्युद्यमसमो बन्धुः कृत्वा यं नावसीदति ॥

आळस हा शरीरात राहणारा मोठा शत्रू आहे. उद्योगासारखा मित्र दुसरा नाही; उद्योग केला की माणूस खचत नाही. आळस टाकून उद्योग धरावा, असा उपदेश आहे.

- पारंपरिक सुभाषित