सुभाषित

दुर्जनः परिहर्तव्यः

दुर्जनापासून दूर राहावे.

दुर्जनः परिहर्तव्यो विद्ययालङ्कृतोऽपि सन् ।
मणिना भूषितः सर्पः किमसौ न भयङ्करः ॥

विद्येने सजलेला असला तरी दुर्जन टाळावा. मण्यांनी सजलेला साप भयंकरच असतो. ज्ञान किंवा देखावा असला तरी स्वभाव वाईट असेल तर धोका राहतो.

- हितोपदेश